गावाविषयी माहिती
ग्रामपंचायत मानिवली ही महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक प्रगतशील ग्रामपंचायत आहे. सदर ग्रामपंचायत मध्ये मानिवली,खैरे,सासणे,आणि पास्ते अशी चार महसूल गावे समाविष्ट आहेत .
१.मानिवली ग्रामपंचायत हे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात असलेले एक ग्रामपंचायत आहे, जेथे प्रामुख्याने मराठी बोलीभाषा बोलली जाते,पिनकोड ४२१३०३ आहे आणि ते वाडा तालुक्याच्या जवळ (सुमारे ६ किमी) आहे, तर जिल्ह्याचे ठिकाण पालघर सुमारे 8० किमी दूर आहे, हि ग्रामपंचायत आदिवासी बहुल असून नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाते. ग्रामपंचायत हद्दीतून पिंजाळ नदी जात असून, ती गावाची जीवनदायीनी आहे.
२. २०११ च्या जनगणनेनुसार २३०७ लोकसंख्या आहे ,हे गाव उत्तर कोकणातील वाडा तालुक्यात येते आणि एक शांत, ग्रामीण भाग आहे, जिथे शेती आणि स्थानिक जीवनशैली आढळते.
३. जे मुख्यत्वे आदिवासी लोकवस्तीचे असून, वाडा तालुक्याच्या उत्तरेकडील भागात येते आणि घनदाट जंगल व निसर्गरम्य परिसरासाठी ओळखले जाते.
मुख्य माहिती:`
सन २०११ च्या जनगणनेनुसार या ग्रामपंचायत ची लोकसंख्या सुमारे २३०७ आहे. ग्रामपंचायत हद्दीमध्ये मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ६ , अंगणवाडी केंद्रे ०६ , तसेच समाजमंदिर-३ अशी शैक्षणिक व सामाजिक सुविधा उपलब्ध आहेत. ग्रामपंचायत क्षेत्रात पिण्याच्या पाण्याच्या सोईसाठी हातपंप, विद्युतपंप , विहिरी तसेच नळपाणी पुरवठा योजना कार्यरत आहेत,ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सासणे गावात राधा कृष्ण मंदिर आहे, व खैरे गावात दत्तमंदिर व सुदामजी नाथ मंदिर आहे, आणि पास्ते व मानिवली गावात गावदेवी मंदिर आहे.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भाजीपाला ही प्रमुख पिके घेतली जातात.
मानिवली ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मानिवली, खैरे, सासणे. पास्ते गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणत आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
मानिवली ग्रामपंचायत आज वाडा तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते.